'रडने का नही.... भिडने का...' भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली तहसीलदार देवरेंची भेट

'रडने का नही.... भिडने का...' भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली तहसीलदार देवरेंची भेट पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका ऑडिओ क्लिपने  सध्या  राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिला होता. या प्रकरणामुळे भाजपला मुद्दा मिळाला आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ  यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी वाघ यांनी तहसीलदारांना 'रडने का नही, भिडने का' असे म्हणत आलिंगनही दिले. तसेच आम्ही सर्व तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं. यामुळे वाघ यांनी लंकेंविरोधात  दंड थोपटल्याचं बोललं जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post