व्यापार्‍यांच्या प्रश्नांसाठी स्व.राठोड यांनी नेहमीच पुढकार घेतला

 मर्चंट असोसिएशनच्यावतीने श्रद्धांजली


व्यापार्‍यांच्या प्रश्नांसाठी स्व.राठोड यांनी नेहमीच पुढकार घेतला - किरण व्होरा     नगर - स्व.अनिल राठोड यांनी स्वत:चा पक्ष आणि तत्वांशी निष्ठा बाळगून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या समाज व राजकारण्यांना जनतेच्या मनात राहतील. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आणि खास नगरी व सेना स्टाईलने नगरकरांचे प्रश्न, अडचणी सोडवण्याच्या पद्धतीमुळे ते सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले. व्यापार्‍यांच्या अनेक प्रश्नांत त्यांनी नेहमीच अग्रही भुमिका घेऊन त्यांचे प्रश्न सोडविले. प्रसंगी प्रशासनाशी भांडून व्यापार्‍यांच्या नेहमीच ते पाठिशी राहिले. त्यांचे कार्य हे नगरकर कधीही विसरु शकत नाही, असे प्रतिपादन किरण व्होरा यांनी केले.


     माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भिंगारवाला चौक येथे एम.जी.रोड मर्चंट असोसिएशनच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी किरण व्होरा, शाम देडगांवकर, अदित्य गांधी, कुणाल नारंग, संतोष ठाकूर, कमलेश आहुजा, नंदू दौडेजा, धीरज मुनोत राजू भंडारी, गणेश गुजर, श्रीनिवास कोडम, सराफ संघटनेचे सुभाष मुथा आदिंसह व्यापारी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post