गावं पोलिस स्टेशनला जोडण्यावरुन विखे व थोरातांमध्ये वादाची ठिणगी, आंदोलनाचा इशारा

गावं पोलिस स्टेशनला जोडण्यावरुन विखे व थोरातांमध्ये वादाची ठिणगी, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा शिर्डी - शिर्डी मतदारसंघातील नऊ गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्याला जोडण्यात आली आहेत या विरोधात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून हा निर्णय मागे न घेतल्यास स्वतः आंदोलन करण्याचा इशारा यांनी दिला आहे या निर्णयाच्या विरोधात या गावांमधील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील ९ गावे तोडून ती संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडली गेली आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशन आमच्या बादांला असताना तक्रांर देण्यासाठी आम्ही २० ते २५ किलोमीटर अतंरावर का जायचे असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे. 

९ ऑक्टोबर २०१३ रोजी आश्वी पोलीस ठाण्याचे लोकार्पण तत्कालीन दिवगंत गृहमंत्री आर. आर. पाटील यानी केले होते. ९० हजार लोकसंख्येसाठी या ठाण्यात ५८ कर्मचाऱ्याना मंजुरी मिळाली होती. आश्वीसह पंचक्रोशीतील गावात शांतता, कायदा, सुव्यवस्था आबादीत रहावी व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यानी आश्वी पोलीस ठाणे होण्यासाठी पाठपुरावा करत महत्त्वाची भुमिका बजावली होती. पोलीस स्टेशन झाल्यानतंर मागील ७ ते ८ वर्षात गुन्हेगारीला जरब बसला आहे. आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, रहिमपूर, कणकापूर, कोंची, मांची, कनोली, मनोली व हंगेवाडी ही गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडली गेली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post