भारतभरातच पालकांची नाराजी...लवकरच बोर्ड योग्य निर्णय घेईल...यशश्री ऍकॅडमीचा मोठा खुलासा...video

 सीबीएसई बोर्डाच्या निकालाबाबत भारतभरातच पालकांची नाराजी...यशश्री ऍकॅडमीचा मोठा खुलासा...नगर : दिनांक 3 ऑगस्ट दुपारच्या सत्रात दहावी सी बी एस ई चा निकाल जाहीर झाला सदर निकाल हा covid-19 परिस्थितीनुसार जाहीर करण्यात आला असून सदर निकालाबाबत पालकांमध्ये मतभिन्नता आढळून येत आहे काही पालक या सदर निकालाबाबत समाधानी नसून सदर पालकांनी यशश्री शाळेत विद्यार्थ्यांन सहित येऊन प्रशासन व प्रचाऱ्यास याबाबत विचारपूस केली असता शालेय प्रशासन तसेच प्राचार्यांनी जे काही उत्तरं या बाबत दिली त्याबाबत पालक समाधानी नसून त्यांनी शाळेत प्राचार्य तसेच प्रशासन यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. सदर निकाल हा covid परिस्थितीनुसार लावण्यात आल्यामुळे व मुलांची लेखी परीक्षा ना झाल्यामुळे सदर निकालाबाबत सीबीएसई काही निकष घालून सदर निकाल जाहीर केला आहे. फक्त यशश्री अकॅडमी नव्हे तर भारत भर बऱ्याच शाळेच्या पालकांमध्ये याबाबत नाराजी दिसून आली आहे.


सदर निकालाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून शाळेने बोर्डाकडे तातडीने दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी पत्रव्यवहार केला तसेच इतर भरतातील बरेच शाळांची व पालकांनी गोंधळाची परिस्थिती लक्षात ठेवता सी बी एस ई ने दी. ५ ऑगस्ट २०२१ ला एका परिपत्रक जरी केले असून ठरविलेल्या निकषावर विचाराधीन असून लौकरच शाळांना तसेच पालकांना या विषयी माहिती देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. 

निकालाबाबत जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीत यशश्री अकॅडमीचे काही पालक हे गोंधळलेल्या अवस्थेत होते. काही पालकांच्या मते त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करण्यात आले किंवा त्यांच्या मुलांच्या विरोधात भूमिका घेण्यात आली. परंतु सदर मुले ही शाळेत मागील दहा ते बारा वर्षापासून शिक्षण घेत असून त्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे आणि शालेय प्रशासन व शाळेचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले असून अशा परिस्थितीत कोणतीही शाळा किंवा शालेय परिषद प्रशासन किंवा प्राचार्य हे शाळेत मुलांच्या विरोधात किंवा त्यांच्या शैक्षणिक नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करणार नाही. आज ६ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व पालकांनी शाळे मार्फत गुणांचा फेरविचार व्हावा आणि मुलांना त्यांच्या गुणवत्तेनुसार गुण देण्यात यावे अशी शाळेकडून सीबीएससी बोर्डाकडे विनंती करण्यात आली.

video यश शर्मा, संस्थाचालक bite0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post