नारायण राणे व उध्दव ठाकरे भविष्यात एका ताटात जेवतील...

नारायण राणे व उध्दव ठाकरे भविष्यात एका ताटात जेवतील...प्रवीण तोगडिया यांचे वक्तव्य

 


नागपूर : राज्यात भाजप- शिवसेना संघर्ष शिगेला पोहोचला असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी त्यावर भाष्य केले आहे. देशाच्या हितात जे काम करतील त्यांच्या बाजूने आम्ही राहू. भाजपाने देशाच्या हिताचे काम केले, तर आम्ही भाजपा जिंदाबाद म्हणू आणि जर शिवसेनेने चांगले काम केले, तर मी शिवसेना जिंदाबाददेखील म्हणेन, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

गुरुवारी त्यांच्या विदर्भाच्या तीनदिवसीय दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकारणात कधी विरोध होईल व कधी लोक एकत्र येतील, हे सांगता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाद भविष्यात मिटू शकतो व एकाच ताटात हे दोघे जेऊ देखील शकतात. भाजपा- सेनादेखील भविष्यात एकत्र येऊ शकतात. राजकारणात हे चालतच असते, असे तोगडिया म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post