महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊंट लॉक

 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊंट लॉक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट ट्विटर कडून लॉक करण्यात आले आहे.  दरम्यान, याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अनिश्चित काळासाठी लॉक करण्यात आले आहे.राहुल गांधी यांनी ट्विटरवर दिल्लीमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा एक फोटो टाकला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री काँग्रेसने दावा केला आहे की, रणदीप सुरजेवाला यांच्या सह पाच वरिष्ठ नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

त्यातच आता गुरुवारी काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले आहे. मायक्रोब्लॉगिंग साईटच्या निमयांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटर कडून सांगण्यात येत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post