कोण आहे ‘ठाकरे’ कुटुंबातील व्हिव्हियन रिचर्डस? वाचा सविस्तर.... मुंबई : शिवसेनापक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे   यांचा आज वाढदिवस  आहे. त्यानिमित्ताने सामना वृत्तपत्रात आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर  यांनी दिलेल्या स्फोटक शुभेच्छांची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. तेजस ठाकरे यांना महान स्फोटक फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस यांची उपमा देत शुभेच्छा देण्यात आल्यात. या जाहिरातीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यासोबतच त्यांनी तेजस ठाकरे यांना “ठाकरे कुटुंबाचा व्हिव्हियन रिचर्ड्स” म्हटल्यामुळे खरी राजकीय चर्चा सुरू झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post