हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं....मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी पळापळ

हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं....मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर  पडण्यासाठी पळापळ


 

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. अशातच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. 

अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. येथे ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिकही भावूक झाले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अशी अनेक दृश्य पाहून सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. असाच एक काळजात चर्र करणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. आपल्या लेकाचा जीव वाचवण्यासाठी हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं आहे. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी काबुल एअरपोर्टवर अफगाण नागरिकांमध्ये अगतिकता दिसून आली आहे. मोठ्या संख्येने लोक आपल्या मुलांना घेऊन विमानतळावर पोहोचले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post