अफगाणीस्तान, तालीबान...‘त्या’ चित्राचा थेट संबंध मराठ्यांच्या इतिहासाशी..वाचा सविस्तर

अफगाणीस्तान, तालीबान...‘त्या’ चित्राचा थेट संबंध मराठ्यांच्या इतिहासाशी.. तालिबान्यांनी शेवटी संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केला आहे. रविवारी त्यांनी काबुलच्या राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेश केला. प्रेसिडेंशियल पॅलेसवर ताबा मिळवल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ विविध माध्यमांनी समोर आणले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला होता. या सगळ्या फोटो आणि व्हिडिओमध्ये एका चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  हे चित्र काबुलच्या प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यातील मोजक्या मौल्यवान चित्रांच्या कलेक्शनमधील आहे. हे अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे.  या चित्रात काही सरदार दिसत आहेत. त्यांच्याकडे हातात तलवारी आणि इतर शस्त्रे आहेत. एक माणूस एका फकीरासमोर वाकून प्रार्थना करत आहे. राजासारखा दिसणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर फकीर काहीतरी शिंपडत आहे. चित्रामध्ये अफगाणिस्तानची ओळख सांगणारे पर्वत आहेत. चित्रात कुळ आणि जमातीचे लोक दिसत आहेत. जी व्यक्तीला फकीरपुढे नतमस्तक होताना दिसते आहे दुसरी कोणी नसून अहमद शाह दुर्रानी आहे. भारताच्या इतिहासात तो अहमद शाह अब्दाली म्हणून ओळखला जातो. अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा पहिला शासक मानला जातो. हे चित्र त्याच्या राज्याभिषेकाशी संबंधित आहे. अहमद शाह अब्दाली आहे ज्याच्या विरोधात मराठ्यांनी पानिपतची तिसरी लढाई लढली होती. अहमद शाह दुर्रानी (अब्दाली) चा राज्याभिषेक ज्या शहरात झाला ते कंदाहार आहे. दुर्रानीने या कंदाहारमध्ये पहिल्यांदा संपूर्ण अफगाणिस्तानला एकत्र केले होते. राज्याभिषेक करताना अब्दाली २५ वर्षांचा होता. राज्याभिषेकाची हीच घटना आहे या चित्रात दाखवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post