जिल्हा परिषदेचा निवडणूक बिगुल खा. सुजय विखे पाटील म्हणाले टक्केवारी बंद करायची असेल तर संपूर्ण सत्ता द्या....

 जिल्हा परिषदेचा निवडणूक  बिगुल  खा. सुजय विखे पाटील म्हणाले टक्केवारी बंद करायची असेल तर संपूर्ण सत्ता द्या....


अहमदनगर:जिल्हा परिषदेच्या कामामध्ये टक्के वारी वाढत चालल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे जास्त दिवस टिकणार नाही . जिल्हा परिषदेमधील कामाची टक्केवारी कायमची बंद करायची असेल भाजप सरकारच्या हातात सत्ता दया. नगर जिल्ह्याचा सुंस्कृतपणा धोक्यात आहे . गरीब आमदार लाखाच्या गाडीत फिरताना सध्या दिसत आहे .२०२२ पर्यत जलजीवन मिशन अंतर्गत सर्वांना शुध्द पाणी मिळणार आहे . महाराष्ट्र जीवन प्राधिकारण ठेका कोणाला दयायचा याच्यामुळे सहा महिन्यापासून या योजनेची फाईल या सरकारने दाबून ठेवली आहे . असा टोला खासदार सुजय विखे या आघाडी सरकारला लावला .

नगर तालुक्यातील आगडगाव,  येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रमुख उपस्थित होते. लसीकरण सेंटरवर फक्त फोटो काढणे, ते सोशल मीडियावर प्रसिद्धिमाध्यमातून फ्लॅश करणे, एवढाच आज काहींचा उद्योग सुरू आहे. केंद्र सरकार मात्र कोविडवर शिस्तबद्ध काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दिवसाला २० लाख लोकांचे लसीकरण करीत आहे. एखाद्या देशाची लोकसंख्याही २० लाख नाही, तेवढे लसीकरण आपण एका दिवसात करतो आहोत. यापुढील काळात गावातील वॉर्ड तेथे लसीकरण उपक्रम प्रत्येक गावात राबवण्यात येईल .कोविड सेंटरवर फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या काही नेत्यांचा त्यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला. विखे पाटील म्हणाले, की तालुक्यातील प्रत्येक रस्ता, बाह्यवळण रस्ता, सूरत महामार्ग आणि इतर महामार्गाने जोडला जात असल्याने तालुक्यातील युवकांना शेतकऱ्यांना चांगले दिवस असतील. ज्या गावातून महामार्ग गेलेल्या इतर गावांची प्रगती आपण पाहत आहात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या विकासाबरोबरच सामान्य नागरिकांचा विकास होणार आहे. तालुक्यातील डोंगरी भागात तातडीने मोबाईल टॉवर उभारण्यावर भर दिला जाणार आहे. या वेळी आगडगाव येथील मारुती मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक (१० लाख), आगडगाव ते मोरदरा रस्ता ,(९० लाख), नगर ते मिरी रस्ता (२ कोटी ४२ लाख), इत्यादी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, रेवण चोभे, पंचायत समिती सदस्य सुनीता भिंगारदिवे, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post