शिक्षक बँक वार्षिक सभेचा झालेला खर्च योग्यच,घोटाळेबाजांना सगळे घोटाळेच दिसतात

 शिक्षक बँक वार्षिक सभेचा झालेला खर्च योग्यच

 घोटाळेबाजांना सगळे घोटाळेच दिसतात-कैलास सारोक्तेपारनेर (प्रतिनिधी) शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीचा कारभार करून सभासदांना कायम ठेवीचे सर्वाधिक व्याज आणि लाभांशाच्या रूपाने भरीव असा फायदा करून दिलेला आहे . गेल्या पाच वर्षातील उच्चांकी रक्कम व्याजाचे रूपाने सभासदांच्या पदरात टाकण्यात आली आहे . एवढा चांगला कारभार केलेला असताना केवळ विरोधासाठी विरोध म्हणून कपोलकल्पित आरोप केले जात आहेत . परंतु जे स्वतः घोटाळेबाज आहेत . विकास मंडळामध्ये ज्याप्रमाणे टेंडर घोटाळा झाला तसा त्यांना इथे सुद्धा घोटाळा दिसतो .शिक्षक बँकेचा मागील वार्षिक सभेचा झालेला खर्च योग्यच आहे .सभा ऑनलाइन असली तरी तिला खर्च असतो त्यामुळे शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतेही आरोप करण्यापूर्वी बँकेतून माहिती घेऊन शहानिशा केली पाहिजे असा घणाघात अकोले तालुका गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष कैलास सारोक्‍ते यांनी केला आहे .

शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना परिषदेचे उपाध्यक्ष गणपत सहाने यांनी मागील वार्षिक सभेबद्दल बेताल आरोप केले होते . त्याला उत्तर देताना सारोक्ते बोलत होते . ते म्हणाले कि वार्षिक सभा ऑनलाइन असली तरी तिचा प्रक्षेपण खर्च, तसेच सभेची नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली त्याचा खर्च, मागील वर्षी सर्वसाधारण सभेचे अहवाल छापले नसले तरी रेकॉर्डसाठी तसेच अभ्यागतांनासाठी छापण्यात आलेल्या अहवालाचा खर्च, सभेच्या ठिकाणी बैठक व्यवस्थेसाठी झालेला खर्च , चॅनल व मीडिया फोटोग्राफी इत्यादी अनेक बाबींचा त्या खर्चामध्ये समावेश आहे .आपणच फक्त स्वच्छ इतर मात्र सगळे बरबटलेले  ही जी विचार प्रवृत्ती जिल्ह्यातील परिषदेच्या लोकांमध्ये आहे ती खुपच घातक आहे .आपण केलेला कारभार स्वच्छ आणि इतरांनी केलेला चुकीचा असा गोड गैरसमज त्यांनी करून घेतला आहे .संचालक मंडळाच्या उत्कृष्ट कारभारामुळे निराश झालेले विरोधी लोक सध्या बेताल आरोप करीत आहेत . विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर जिल्ह्यातील सर्व सभासद खूश आहेत . अवघ्या सव्वा टक्क्यांच्या फरकाच्या कारभार केला आहे . बेछूट आरोप करून सभासदांची सहानुभूती मिळविण्याचा  केविलवाणा प्रयत्न कोणी करू नये .जे स्वतः घोटाळेबाज आहेत त्यांना इतर ठिकाणी सर्व घोटाळेच दिसतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे . काटकसरीच्या कारभारामुळेच सभासदांना सव्वा आठ टक्के कायम ठेवीवर व्याज आणि लाभांश सात टक्के देणे शक्य झाले आहे सात टक्के लाभांश यावर्षी मिळणार आहे याच्यावर अजूनही अनेकांचा विश्वास नाही परंतु ही किमया संचालक मंडळाने करून दाखवली आहे . त्यामुळे खोटे आरोप करून सभासदांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणी करू नये जे स्वतः घोटाळेबाज आहेत त्यांना इतर ठिकाणी सर्व घोटाळेच दिसतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे . प्रसिद्धी पत्रकावर अण्णासाहेब आभाळे ,रघुनाथ देशमुख, दीपक बोराडे ,लालू भांगरे ,नितीन नेहे ,मारुती बांगर, बाळासाहेब बिन्नर ,संजय मुखेकर ,मनोहर गोडे, प्रवीण साळवे ,कैलास वाकचौरे ,बाळासाहेब आरोटे ,राजू शिंदे, अश्फाक शेख, विठ्ठल सावळे, कैलास शेळके, सचिन गवांदे आदींची नावे आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post