सुभाष बुलाखे सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निमित्त गौरव

सुभाष बुलाखे सेवानिवृत्त   सेवानिवृत्ती निमित्त गौरवकेडगाव: अहमदनगर प्रधान डाकघरातील ओव्हरसियर पोस्टमन श्री सुभाष आबाजी बुलाखे हे त्याचे 26 वर्षाच्या  प्रदीर्घ सेवेनंतर आज दि 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले.

  श्री बुलाखे यांनी त्याचे डाकसेवक ,ब्रँच पोस्टमास्टर सुरेगाव ता श्रीगोंदा येथून प्रारंभ केला. 6 वर्ष सुरेगाव येथे काम पाहिल्यानंतर खाते अंतर्गत परीक्षा होऊन पदोन्नती होऊन ते  अहमदनगर प्रधान डाकघर येथे पोस्टमनच्या सेवेस सुरवात केली.त्यानंतर सावेडी रोड येथेही काही काळ सेवा केले नंतर कर्जत व अहमदनगर पश्चिम उपविभागात मेल ओव्हरसियर ,व सध्या अहमदनगर प्रधान डाकघर येथे कॅश ओव्हरसियर पदी ते आज सेवानिवृत्त झाले.

श्री बुलाखे हे कर्तव्यदक्ष तर सतत हसतमुख असत ते आपल्या विनोदी स्वभावने परिचित होते.  आज केडगाव पोस्टऑफिस मध्ये त्याचे सेवानिवृत्त निमित्त त्याचा यथोचित गौरव करण्यात आला.या वेळी बोलताना श्री संतोष यादव म्हणाले,की श्री बुलाखे यांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केली ,पोस्टमन पदी काम करताना आपल्या ग्राहकांना सतत हसतमुखाने सेवा दिली .पोस्टमन हे डाक विभागाचा ब्रँड आहे.असे सांगत त्याना सेवानिवृतिच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रीमती शुभांगी मांडगे, सविता ताकपेरे,श्री शिवाजी कांबळे,श्री स्वप्नील पवार,श्री अंबादास सुद्रीक,श्री सूर्यकांत श्रीमंदिलकर,श्री अनिल धनावत, श्री संजीव पवार,श्री बाबासाहेब बुट्टे हे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post