PUBG खेळण्यासाठी आईच्या खात्यातून 10 लाख केले लंपास...विचारणा केल्यावर अल्पवयीन मुलगा झाला गायब

 


मुंबई :    PUBG खेळण्यासाठी आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च करून 16 वर्षाच्या मुलाने घर सोडलं. एवढंच नाही तर यानंतर हा मुलगा घर सोडून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील अल्पवयीन मुलानं हे कृत्य केलं आहे. मुंबईत अंधेरी पूर्वेत एक 16 वर्षीय मुलगा घरातून पळून गेला कारण त्याच्या पालकांनी त्याला PUBG खेळण्यासाठी ऑनलाइन व्यवहारातून 10 लाख रुपये खर्च केल्याबद्दल फटकारले होते. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली केव्ह्स परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या पालकांकडे परत पाठवले. 

ही घटना बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. मुलाच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली होती. तपासादरम्यान  मुलाच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचा 16 वर्षाचा मुलगा गेल्या दीड महिन्यापासून PUBG गेमच्या आहारी गेला होता. मोबाईलवर गेम खेळत असताना त्याने त्याच्या आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च करून आयडी आणि चालान मिळवलं होतं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post