....तर शिवसेनेचं 2024 मध्ये खूप मोठं नुकसान होईल

....तर शिवसेनेचं 2024 मध्ये खूप मोठं नुकसान होईल -  रामदास आठवलेअमरावती: रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. 2014मध्ये शिवसेनेचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत युती करावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. 


रामदास आठवले आज अमरावतीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं. जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाही तर शिवसेनेचं 2024 मध्ये खूप मोठं नुकसान होईल. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही, असं आठवले म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post