असाही ‘बदला’...त्याने सापाला चावून चावून मारले...

असाही ‘बदला’...त्याने सापाला चावून चावून मारले... भुवनेश्वर : ओडिशाच्या   जाजपूरमध्ये एका व्यक्तीला साप चावला. त्याने त्याचक्षणी सापाचा बदला घेतला. माणसाच्या चाव्याने साप देखील मरण पावला. एका 45 वर्षीय व्यक्तीला सापाने दंश केला, प्रत्त्युत्तरादाखल संबंधित व्यक्तीने सापावर हल्ला चढवला. हल्ल्यात सापाचा तडफडून मृत्यू झालाय 

  दानागडी भागात, किशोर बद्रा नावाच्या व्यक्तीला बुधवारी रात्री शेतातून परतताना सापाने दंश केला. किशोरने त्याच क्षणी त्या सापाला पकडलं, त्याच्यावर हल्ला चढविला आणि सापाला जखमी केलं, पण किशोरच्या हल्ल्यात सापाला आपले प्राण वाचवता आले नाही. किशोरने तो मृत साप आपल्या घरी आणला आणि आपण केलेला पराक्रम पत्नीसमोर कथन केला.  किशोरने सांगितलं, ‘जेव्हा मी रात्री शेतातून घरी येत होतो, तेव्हा काहीतरी माझ्या पायाला टोचतंय असं मला जाणवलं. मी टॉर्च लावून पाहिलं असता, साप माझ्या पायावर होता. मी त्याचक्षणी सापाला घट्ट पकडलं.. आणि त्याला सतत चावत राहिलो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post