आ.संग्राम जगताप यांनी सीनानदीच्या पूर परिस्थितीची पाहणी ....video

 शहराचे आ.संग्राम जगताप यांनी सीनानदीच्या पूर परिस्थितीची केले पाहणी अमरधाम जवळील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल - आ.संग्राम जगताप


अहमदनगर प्रतिनिधी- अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आला आहे.नेप्ती नाक्याजवळील सीना नदी पूल अनेक वर्षांचा झाला असल्याने पुलाची अवस्था खराब झाला आहे.या पुरा मुळे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.याचा या पार्श्वभूमीवर आ.संग्राम जगताप यांनी सीना नदीला आलेल्या पुराच्या परिस्थितीची व पुलाची पाहणी केली. कल्याण रोड हा राष्ट्रीय महामार्ग आहे या पुलाच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली असून लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध होणार असल्याचे आ.संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. उपमहापौर गणेश भोसले,प्रा.माणिकराव विधाते,वैभव वाघ,राम वाघ,संतोष लांडे,अनुप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post