साडेचार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, नराधमास अटक

साडेचार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, नराधमास अटक संगमनेर : घराशेजारी राहणाऱ्या   तरुणाने साडेचार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी  दुपारच्या सुमारास संगमनेरातील एका उपनगरात घडली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी  रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रोशन रमेश ददेल, असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून, तो नेपाळमधील असल्याची माहिती आहे.  बालिकेवर अत्याचार झाल्याचे तिच्या बोलण्यातून समजल्यानंतर तिच्या वडिलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, निकिता महाले, पोलीस नाईक विजय पवार, अविनाश बर्डे, विजय खाडे, अनिल कडलग, श्याम हासे यांनी रोशन ददेल याला पळून जाताना पकडले.   पोलीस उपनिरीक्षक महाले या अधिक तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post