शिवसेनेचे भाजपशी वैचारिक बंध कायम आहेत...

शिवसेनेचे व भाजपशी वैचारिक बंध कायम आहेत, बाहेरुन आलेल्यांनाच संघर्ष हवा असतो 

 


मुंबई: भाजप सोबतच्या आमच्या नात्यात कधीच कटुता आली नाही. कधी येणार नाही. आमच्यातील बंधन हे हिंदुत्वाचं बंधन आहे, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेना भाजपच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या नात्यात कधी कटुता आली नाही. कधी येणार नाही. आम्ही वैचारिक बंधनाने नेहमीच जोडलेलो आहोत. ते बंधन हिंदुत्वाचं आहे. आम्ही वेगळे झालो आहोत, पण आम्ही कधी एकमेकांवर वैयक्तिक दुश्मनीचं वातावरण तयार केलं नाही. आम्ही कधीच एकमेकांच्या कार्यालयावर दगडफेक केली नाही. एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला नाही, असं सांगतानाच पण बाहेरून आलेल्या भाजपच्या लोकांना वाटतं हा संघर्ष सुरू राहावा. याचा सर्वात मोठा धोका भाजपचे विद्यमान नेत्यांना राहील, असा इशारा राऊत यांनी दिला.

महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. आता कोणी तरी बाहेरचा माणूस येतो शिवसेना भवनावर दगड मारू म्हणतो, कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारू म्हणतो. हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post