नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर नतमस्तक!

 नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर नतमस्तक!मुंबई: केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून भाजपचं शक्तिप्रदर्शन. राणे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर नतमस्तक! आज माझ्या मंत्रिपदामुळे स्वत: बाळासाहेबांनाही आनंद झाला असता, त्यांचे आशिर्वाद कायम माझ्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया देत राणेंनी शिवसेनेलाही डिवचले.  महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे, कुणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत, अशा गोष्टी बोलू नयेत. अन्यथा येणाऱ्या महापालिकेत गेल्या 2 वर्षात तुम्ही येथील जनतेला कसं पाठीमागे टाकंल, याचा उद्धार होणारच आहे. पण, येथील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही, असे राणेंनी म्हटले. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीपद दिलं, त्यामुळे मला आपली सोबत हवीय, असेही नारायण राणेंनी म्हटलं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post