जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नारायण राणे वर गुन्हे दाखल करा

 नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नारायण राणे वर गुन्हे दाखल करा - शिवसेनाचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांची मागणी
अहमदनगर- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वर नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने तातडीने कलम 502,505,153 अ नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे नगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी कर्जत तालुका प्रमुख मळीराम यादव, पाथर्डी तालुका प्रमुख अंकुश चितळे, जामखेड तालुका प्रमुख संजय काशीद, शेवगाव शहर प्रमुख सिद्धार्थ काटे, जामखेड शहर प्रमुख गणेश काळे, शेवगाव युवा सेनेचे शितल पुरनाळे,महेश पुरणाळे, ॲड. अरुण बनकर, भगवान दराडे, नवनाथ उगलमुगले,सावता हजारे, दक्षिण महिला जिल्हाप्रमुख मंगळ म्हस्के,सीमा दाळीमकार,मीरा बडे, अनघा वाघमारे,शिवाजी काटे,प्रवीण अनभुले,विलास वांधेकरआदी उपस्थित होते.

         नारायण राणे यांच्या विधानाने समाजात द्वेष व तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, राणे यांच्या विधानाने महाराष्ट्रातील सर्व सामान्यांच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपद हे घटनात्मक पद आहे याची देखील जाणीव स्वतः त्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला नाही, समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा अशी विधाने सदरील व्यक्ती नेहमीच करत असतात तरी या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करून तातडीने गुन्हे दाखल करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post