राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी बुधवारी नगरमध्ये

 राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी बुधवारी अहमदनगरमध्ये


जिल्हा समन्वय समिती पुनर्गठनासाठी बैठकीचे आयोजननगर: राजपत्रित अधिकारी महासंघाची अहमदनगर जिल्हा समन्वय समितीच्या पुनर्गठनासाठी बुधवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी बैठक होत असून त्यासाठी राज्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे आणि सरचिटणीस इंजिनीअर विनायक लहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष संदीप निचित उपस्थित राहणार असल्याची माहिती महासंघाचे राज्य संघटक विठ्ठलराव गुंजाळ यांनी दिली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी दुपारी ४ वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत जिल्हा समन्वय समितीचे पुनर्गठन, जिल्हा दुर्गा मंचचे पुनर्गठन, जिल्हा समन्वय समितीच्या कामकाजाचा आढावा आणि महासंघाच्या पुढील कामकाजाची दिशा यावर विचारविनिमय होणार आहे. या बैठकीस राजपत्रित अधिकारी वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. गुंजाळ यांनी केले आहे. *

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post