राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी खा.विखेंचे जोरदार प्रयत्न...सहकार मंत्र्यांकडे महत्वाची मागणी

 राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी खा.विखेंचे जोरदार प्रयत्न...सहकार मंत्र्यांकडे महत्वाची मागणीराहुरी -सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळास एक वर्षाची मुदतवाढ देवून पुढील गळीत हंगामासाठी काखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सहकार विभागाने स्पष्टीकरण द्यावे आशी विंनती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना केली.

खा.विखे यांनी मंत्रालयात मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेवून राहुरी सहकारी साखर कारखान्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली.कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जून मध्ये संपली आहे.कोव्हीड कारणाने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घ्यायचा नाही असा निर्णय राज्य सरकारचा आहे.आॅगस्ट नंतर याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होणार असल्याने राहुरी कारखान्याच्या समोर पुढील गळीत हंगामाचे मोठे आव्हान उभे असल्याची बाब खा.विखे यांनी सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

    गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात करावी लागणारी काम आणि  गुंतवणूक याचे निर्णय करावे लागणार असल्याने संचालक मंडळाच्या बाबतीत सहकार विभागाने योग्य मार्गदर्शन करावे आशी विनंती लेखी पत्राद्वारे केली असल्याचे  खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post