... तर राज्यभरातील पोतराजांसह विधान भवनासमोर आंदोलन करणार

 ... तर राज्यभरातील पोतराजांसह विधान भवनासमोर आंदोलन करणार : भाऊसाहेब उडाणशिवे नगर : पोतराज , जोगती , वाघे- मुरळी , आराधी  आणि समस्त कलावंत आणि सिने कलावंतांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नसेल तर आगामी काळात विधान भवनासमोर राज्यातील समस्त पोतराजांसमवेत येऊन आंदोलन करावे लागेल असा ईशारा महाराष्ट्र पोतराज संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे यांनी दिला.


एक पात्री किंवा दोन-तीन कलाकारांच्या मदतीने सोसायट्यांच्या आवारात सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी ,फी न भरल्यामुळे रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले असून संबंधित संस्था चालकांशी बोलून हा प्रश्न निकाली काढावा,या व्यतिरिक्त दीड वर्षात कमाई नसल्याने घर भाडे ,वीज बिल, भरण्यात अडचणी येत असल्याने  संबंधींत आस्थापनांनी रंगकर्मींना यात सवलत द्यावी,महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत दर महा पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा, महाराष्ट्रातील विखुरलेल्या या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी ,  कलाकार पेन्शन योजनेच्या लाभासाठी अटींमध्ये शिथिलता आणावी, मानधनाच्या आकड्यात वाढ करावी, रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, या व अन्य मागण्यांचे निवेदन शासन दरबारी देण्यात आले असून शासनास जाग आणण्यासाठी 

हुतात्मा स्मारकात वाजंत्री पोतराजांसह आपली कला सादर करत निदर्शने करण्यात आली. 


आमच्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे  पोहोच झाले असून, या निदर्शनाच्या माध्यमातून शासनाला स्मरण करून देत आहोत. असे सांगतानाच आमचा लढा वैयक्तिक नसून  समस्त कलावंत बांधवांसाठी आहे. आमच्या मागण्यांची शासनाने जर दखल घेतली नाही तर राज्यभरातील पोतराजांना घेऊन विधान भवनासमोर आंदोलन करावे लागेल असे सिने अभिनेते प्रशांत नेटके पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post