पोलीस असल्याचं भासवत लुटलेला दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

 पोलीस असल्याचं भासवत लुटलेला दीड कोटीचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या 72 तासांत आरोपींना बेड्या


पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर 6 जणांनी एक एसटी बस अडवून तब्बल दीड कोटीचा मुद्देमाल लंपास केला होता. महत्वाची बाब म्हणजे या आरोपींनी पोलीस असल्याचं भासवत ही लूट घडवून आणली होती. पोलिसांचा गणवेश परिधान करत या आरोपींनी पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बस थांबवली. त्यानंतर एसटीतील 4 जणांना त्यांच्या बॅगसह खाली उतरवलं. त्यानंतर त्या प्रवाशांजवळील दीड कोटीचा मुद्देमाल घेत तिथून पोबारा केला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 54 हजार 540 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. 

पुणे जिल्ह्यातील पाटस टोल नाक्यावर हा लुटीचा प्रकार घडला होता. हितेंद्र जाधव यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. हे प्रवाशी एका कुरिअर कंपनीचे पैसे घेऊन जात होते. निलंगा, लातूर आणि सोलापूर इथून कुरिअर कंपनीचे लोक एसटी बसमध्ये बसले होते. त्यावेळी एसटी बसला गाडी आडवी लावून आरोपींनी प्रवाशांची लूट केली होती. त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयांची ही लूट होती. पोलिसांनी अवघ्या 72 तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एकूण 6 आरोपींपैकी 3 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post