पंतप्रधान योजनेंतर्गत आधार कार्डवर 1 टक्के व्याजाने लोन...समोर आला मोठा खुलासा...

 पंतप्रधान योजनेंतर्गत आधार कार्डवर 1 टक्के व्याजाने लोन...समोर आला मोठा खुलासा...  सरकार फक्त 1 टक्के व्याजाने कर्ज वाटत आहे, तर  तुम्ही ते कर्ज घेण्याचा जरूर प्रयत्न कराल. व्हॉट्सअॅपवर अशाप्रकारचे 1 टक्के व्याजाचे पंतप्रधान योजनेचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान योजनेंतर्गत आधार कार्डवर 1 टक्के व्याजाने लोन मिळत आहे. यावर लिहिण्यात आले आहे की, पंतप्रधान योजना आधार कार्डद्वारे 1% व्याजदराने लोन, 50 टक्के सूट. 


सरकारी एजन्सी PIBFactCheck ने याबाबत मोठा इशारा दिला आहे. आधार कार्डावरून लोन मिळण्याचा दावा करणारी ही योजना बोगस आहे, असे पीआयबीने म्हटले आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाहीय जी एवढ्या कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post