सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी तरुण पोलिसांच्या ताब्यात

 सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी, सोलापुरात तरुण पोलिसांच्या ताब्यातआरोपी गणेश ज्ञानोबा बोड्डू वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे निराधार तक्रारी, नोटीसा, विविध अर्ज करत होता. सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांना बदनाम करून सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी त्याने दहा लाख रुपयांची मागणी केली होती

सोलापूर : सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. गणेश ज्ञानोबा बोड्डू असे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. निराधार तक्रारी आणि विविध अर्ज केल्यानंतर तक्रारी मागे घेण्यासाठी आरोपीने दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

आरोपी गणेश ज्ञानोबा बोड्डू वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे निराधार तक्रारी, नोटीसा, विविध अर्ज करत होता. सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांना बदनाम करून सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी त्याने दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post