पटोलेंकडून काळेंच्या पाठीवर कौतुकाची थाप, शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पटोलेंचा सत्कार

 प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोलेंची जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भेट ;

पटोलेंकडून काळेंच्या पाठीवर कौतुकाची थाप, शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पटोलेंचा सत्कारप्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांची शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नुकतीच भेट घेतली. काळे यांना जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने वर्षभराचा नगर शहरातील संघटनात्मक कामांचा कार्य अहवाल यावेळी काळे यांनी आ. पटोले यांना सुपूर्द केला. यावेळी आ.पटोले यांनी काळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असून शहरातील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी काळे यांच्यासमवेत शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते. यावेळी काळे यांनी मागील वर्षभरामध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध संघटनात्मक उपक्रम, मोहिमा, अभियान, आंदोलने, मोर्चे, उपोषणे आदींचा अहवाल पटोले यांना सुपूर्द केला.  

नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे काम उत्तमरीत्या सुरू असून काळे यांच्या कामाबद्दल यावेळी आ. नाना पटोले यांनी समाधान व्यक्त केले. काँग्रेस पक्षाची संघटना शहारात अधिक मजबूत करत बूथ कमिट्या गठित करण्या संबंधीच्या सूचना यावेळी पटोले यांनी काळे यांना दिल्या. विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नगर शहरातील काँग्रेस सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम करत राहील. तसेच संघटनात्मक विस्तार अधिक मजबूत केला जाईल, अशी ग्वाही यावेळी काळे यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना दिली. 

आ. नाना पटोलेंचा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार :

किरण काळे यांच्या हस्ते आ.नाना पटोले यांचा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पटोले यांना ऐतिहासिक भुईकोट किल्ला तसेच देशाचे दिवंगत प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा भेट देण्यात आली. पंडित नेहरू नगरच्या किल्ल्यात  कैद असताना त्यांनी लिहिलेल्या "डिस्कवरी ऑफ इंडिया" हे पुस्तक यावेळी पटोले यांना भेट देण्यात आले. यावेळी काळे यांनी आ. पटोले यांना भुईकोट किल्ल्याच्या भेटीसाठीचे निमंत्रण दिले. मी लवकरच किल्ल्याला भेट देण्यासाठी येईल, असे यावेळी पटोले यांनी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post