दुर्देवी....व्यसनाधीन मुलाने दारुपायी जन्मदात्या आईलाच संपविले....

दुर्देवी....व्यसनाधीन मुलाने दारुपायी जन्मदात्या आईलाच संपविले.... जालना :  परतूर तालुक्यातील लोणी गावात दारुड्या मुलाने दारू खरेदी करण्यासाठी घरातील धान्य विकायला घेऊन जात असताना, आईने अडवले म्हणून आईला बांबूने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे.

 लोणी गावातील सखाराम शिंदे या तरुणाला दारूचे व्यसन असल्याने तो दारूच्या आहारी गेलेला आहे. दारू पिण्यासाठी तो घरातील वस्तूंची नेहमी विक्री करत असायचा. गुरुवारी सकाळी दारू साठी पैसे नसल्याने तो घरातील गुहू आणि तांदूळ घरून विक्री साठी घेऊन जात असताना आपल्या घरात खाण्यासाठी एव्हढेच गहू आणि तांदूळ असल्याचे म्हणत त्याला आईने अडविण्याचा प्रयत्न केला.

नशेत बेधुंद असलेल्या सखाराम शिंदे आईने शेजारीच पडलेल्या बांबूच्या काठीने आईला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत त्याच्या आईच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. शेजारीच असलेल्या नागरिकांनी या महिलेला उपचारासाठी आष्टी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, जालना येथे नेण्यात येत असताना त्यांचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृत्यु झालेल्या महिलेच्या पतीच्या तक्रारी वरून आरोपी सखाराम शिंदे या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post