राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो...शिवसेना खासदाराचे मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो...शिवसेना खासदाराचे मोठं वक्तव्य 



परभणी :  आयएएस अधिकारी आंचल गोयल परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झाल्या आहेत. परभणी येथे रुजू होण्यासाठी आंचल गोयल 27 जुलै रोजी   परभणीत आल्या होत्या.  मात्र नियुक्तीच्या दिवशीच गोयल यांना मुंबईत परत बोलवण्यात आल्याने त्या पदभार न स्वीकारता परतल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार देण्यात यावा, अशा आदेशाचे पत्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंत्रालयातून आले.

मात्र गोयल यांना पदभार घेण्यास कोण रोखत होतं? याविषयी पहिल्यांदाच उघड वक्तव्य करण्यात आलं आहे. जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता, असं वक्तव्य शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव  यांनी केलं.

“आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठपर्यंत सहन करायचं. माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत. काल जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता. तुम्हाला सगळं जमतं. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जे काही आदेश येईल ते मान्य केलं. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे” असं परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post