सैराट..प्रेमविवाह केल्याच्या रागातून बहिणीवर प्राणघातक हल्ला

 सैराट..प्रेमविवाह केल्याच्या रागातून बहिणीवर प्राणघातक हल्ला


 

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात बहिणीने घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीवर प्राणघातक हल्ला केला.  खुरप्यानं बहिणीचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय. सुदैवानं या हल्ल्यात बहिण थोडक्यात बचावली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या गुढे गावात ही घटना घडली आहे. गुढे गावात एका मुलीनं घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केला. या विवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या भावानं आपल्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करत खुरप्यानं तिचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र, ती या हल्ल्यात बालंबाल बचावली. खुरप्याने वार केल्यानं बहिणीच्या पाठीवर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post