जिल्ह्यातील पाच तालुक्यांत 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध

 सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत 13 ऑगस्टपासून कडक निर्बंधसोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे कोरोना निर्बंधांबाबतच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीही या तालुक्यांचा उल्लेख करत कोरोना वाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं रात्री हा आदेश काढला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post