माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन

 नवनाथ विद्यालयात माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन

दादापाटलांनी सर्वसामान्य जनतेचे भल हेच विचार व ध्येय ठेऊन काम केले -साहेबराव बोडखे


नगर - निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात लोकनेते माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन करण्यात आले. नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले स्व. शेळके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे यांच्या हस्ते स्व. दादापाटील शेळके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, उप शिक्षिक काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तुकाराम खळदकर, लहानू जाधव आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post