निंबळकच्या पाणी प्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण बैठक, राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आदेश

निंबळकच्या पाणी प्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण बैठक, राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आदेश

 


अहमदनगर औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या मौजे निंबळक येथील जमीनीचे संपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत झालेले आहे. महामंडळाकडून या ग्रामपंचायतीला पाण्याची नळजोडणी करण्यात आली असून या भागातील औद्योगिक विकासासह लोकसंख्येत विलक्षण वाढ होत आहे. निंबळक ग्रामपंचयातीस वाढीव पाणीपुरवठा, ग्रामपंचायत हद्दीत पथदिवे, पाणीपुरवठा थकबाकी हफ्त्यांमध्ये भरणा करण्याबाबत सूट अशा विविध विषयांच्या अनुषंगाने उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पारनेरचे आमदार श्री. निलेश लंके, उद्योग विभागाचे अवर सचिव श्री. किरण जाधव, मुख्य अभियंता श्री. सुभाष तुपे, तहसिलदार, सरपंच-निंबळक, संबधित अधिकारी आदी उपस्थित होते.
मौजे निंबळक, जि. अहमदनगर येथील प्रकल्पबाधित गावांना आवश्यक पाणीपुरवठा व नागरी सुविधांचा स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करणे तसेच, एकूण पाणीपुरवठा थकबाकी हफ्त्यांमध्ये भरणा करण्याबाबत ग्रामपंचायतीचे हमीपत्र महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास देणे याबाबत संबंधित ग्रामपंचायतीस सुचना राज्यमंत्री अदिती तटकरे दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post