शेवगाव तालुक्यात NDRF चे पथक दाखल... अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान

 


नगर: शेवगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आल्याने नद्यांना पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने तब्बल बारा तासांपासून वाहतूक ठप्प असून अनेक गावांना पुराने वेढा दिला आहे. बचाव कार्यासाठी पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि औरंगाबाद महानगरपालिकाचे आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले आहे. अनेकांची जनावरे आणि वाहने वाहून गेली असून आतापर्यंत एक जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. 

नगर जिल्ह्यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याला पावसाचा जास्त फटका बसला आहे. शेवगाव तालुक्यात आखेगाव, वडुले, वरुर, भगूर, खरडगाव या नदीकाठच्या गावात पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. सुमारे दीडश जण पुराच्या पाण्यात अडकले होते. काहींची जनावरे, वाहने वाहून गेली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वडुले येथील ज्येष्ठ नागरिक मुरलीधर आनंदराव सागाडे देव दर्शनासाठी गेले असता, ते बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post