मुलींनाही मिळणार एनडीए प्रवेशाची संधी...सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुलींनाही मिळणार एनडीए प्रवेशाची संधी...सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

  आता देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देणारा निकाल जाहीर केला आहे. एनडीए म्हणजेच, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारं आता मुलींसाठीही खुली होणार आहेत. एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींनाही देता येणार आहे. या निर्णयानं सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील मुलींना मोठा दिलासा दिला आहे. 5 सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा आहे आणि पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे.

दिल्लीतील वकील कुश कालरा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी पदवीनंतरच महिलांना सैन्यात भरती करण्याची परवानगी आहे. त्यांच्यासाठी किमान वयही 21 वर्षे ठेवण्यात आले आहे. तर मुलं मात्र बारावीनंतरच एनडीएमध्ये प्रवेश घेऊ शकतात, असं म्हटलं होतं. केवळ महिला असल्यानं लिंगभेद करुन त्यांना एनडीएत प्रवेश नाकारणं हा त्यांच्या मुलभूत अधिकारांवर हल्ला आहे, असंही या जनहित याचिकेत म्हटलं होतं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post