राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे, राष्ट्रवादीचा खोचक टोला

 

राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे, राष्ट्रवादीचा खोचक टोलाराष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला गुरुवारी दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंना वाचन वाढवण्याचा सल्ला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हा सल्ला दिलाय.


“राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. “या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे”, असेही नवाब मलिक म्हणाले.

“छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे,” असा उपरोधिक टोला लगावतानाच “राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे,” असं मलिक म्हणाले आहेत. तसेच राज ठाकरेंनी वाचन वाढावे असा खोचक टोलाही मलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना लगावलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post