राणे विरुध्द शिवसेना संघर्ष...नाशिकमध्ये शिवसैनिकांची भाजप कार्यालयावर दगडफेक

राणे विरुध्द शिवसेना संघर्ष...नाशिकमध्ये शिवसैनिकांची भाजप कार्यालयावर दगडफेक नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत असताना नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुख्य संपर्क कार्यालयावर दगडफेक करुन तोडफोड केली आहे. 

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला असताना नाशिकच्या भाजपा कार्यालयाबाहेर कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला नव्हता. युवासेनेचे चार कार्यकर्ते एका कारमधून कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात भाजपा कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post