अग्रलेखातून राणेंची बदनामी, ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार

अग्रलेखातून राणेंची बदनामी, ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार


 

नाशिक : राणेंच्या अटकेनंतर जामीनावर त्यांची सुटका झाली. मात्र रस्त्यावरचा संघर्ष शमला असला तरी आता सेना - भाजपाच कागदोपत्री संंघर्ष सुरु झाला आहे. सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर बोचरी टीका केली, याचंच फलित म्हणून आता सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

राणेंच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेनेने राणेंना कडवा विरोध केला होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. त्यांना त्याच दिवशी जामीन मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून नारायण राणेंवर जोरदार हल्ला केला गेला. ''भोकं पडलेला फुगा'' या शीर्षकांतर्गत लिहीण्यात आलेल्या अग्रलेखात नारायण राणेंवर प्रहार केला गेला. नाशिकमधील शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी थेट या अग्रलेखाचे मोठ-मोठे बॅनर्स छापून ते जागोजागी लावले. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. याबाबत नाशिकमधील भाजप स्थानिक भाजप कार्यकर्ते शिवाजी निवृत्ती बारके यांनी रश्मी ठाकरे आणि अजय बोरस्ते यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post