नाभिक समाज ११ ऑगस्ट हा दिवस "राष्ट्रीय सलून दिवस" म्हणून सर्वत्र साजरा करणार

 नाभिक समाज ११ ऑगस्ट हा दिवस "राष्ट्रीय सलून दिवस" म्हणून सर्वत्र साजरा करणार


आमची एकता हीच आमची ओळखनाभिक समाजाच्या पारंपरिक सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाची ओळख आणि सामाजिक एकतेचे दर्शन व्हावे म्हणून देशातील सर्व नाभिक बांधव येणारा ११ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सलून दिवस म्हणून साजरा करणार आहेत


गेल्या वर्षाच्या लॉक डाऊनच्या काळा पासून म्हणजेच मार्च २०२० पासुन सकल नाभिक समाज कोरोना महामारीशी लढत आहोत,

कोरोनाचा सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे,

लॉक डाऊनच्या काळात सलून व्यवसाय वाचविण्यासाठी

आणि सरकारी मदत मिळविण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रीय जनसेवा पक्षासह सर्वच संघटनांनी पुढाकार घेऊन तत्परता दाखवली होती,परंतु सरकारने मात्र कोणत्याही निवेदनाची साधी दखल सुध्धा घेतली नाही,

याच दरम्यान *सेव्ह सलून इंडिया (save salon india)* ची स्थापना झाली.

सलून व्यवसायिकांची व्यथा आणि व्यवसायिकांचा आवाज सरकार दरबारी पोहवविण्याचे महत्वपूर्ण काम *save salon india* च्या माध्यमातून करण्यात आले,

काही ठिकाणी नाभिक बांधवांना आणि सलून व्यवसायिकांना वेगवेगळ्या स्वरूपात मदतही करण्यात आली,

नाभिक समाजातील जवळ जवळ शंभराच्या वर संघटना या कार्यात सामील झाल्या होत्या,

यावेळी सामाजिक ऐक्यासारख्या महत्वाच्या विषयावर विचारांची देवाणघेवाण होऊन माननीय पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे साहेब यांना ट्विटर द्वारे लाखाच्यावर ट्विट केले गेले..

दीड लाखाच्या आसपास ईमेल पाठविण्यात आले,

भविष्यातही अशाच प्रकारे सलून, ब्युटी पार्लर व्यवसायिकांचा आवाज आणि प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी *सेव्ह सलून इंडिया* कटिबध्द राहणार आहे,

*या सामाजिक ऐक्याच्या दिवसाची आठवण कायम स्मरणात रहावी आणि संपूर्ण जगाला सलून व्यवसायाची ओळख व्हावी म्हणून हा ११ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सलून दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय देश पातळीवर घेण्यात आला आहे,.

या ऐतिहासिक दिवसाची ओळख नाभिक समाजा सह इतरांनाही व्हावी आणि सामाजिक ऐक्यातून समाजाच्या सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाची देखील एक वेगळी ओळख तयार व्हावी म्हणून येणारा ११ ऑगस्ट हा दिवस देशभरात"राष्ट्रीय सलून दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे,

या दिवसाची महती आणि माहिती समाज बांधवांनी सर्वांपर्यंत पोहचवून संपूर्ण जगाला सलून व्यवसायाची ओळख करून द्यायची ही नामी संधी आहे,कृपया सर्वांनी सहकार्य करून आपल्या व्हॉट्सॲप,

फेसबुक,आणि इंस्टा तथा इतर प्रसिध्दी माध्यमा द्वारे आपली ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन ख्यातनाम केश रचनाकार श्री.उदयजी टक्के साहेब आणि समाजसेवक श्री.संजय पंडित यांनी केले आहे..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post