ठाकरे व फडणवीसांचे गुफ्तगु, सेना भाजप युतीबाबत खा.सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

ठाकरे व फडणवीसांचे गुफ्तगु, सेना भाजप युतीबाबत खा.सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया नागपुरात आज राष्ट्रवादीची संघटनात्मक बैठक आहे. या बैठकीसाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडासावेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post