भावी पंतप्रधान कोण हवा? मोदींच्या लोकप्रियतेत घट...योगी आदित्यनाथांना पसंती वाढली..सर्व्हे

भावी पंतप्रधान कोण हवा? मोदींच्या लोकप्रियतेत घट...योगी आदित्यनाथांना पसंती वाढली..सर्व्हे नवी दिल्ली  गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमालीची घटलेली दिसून आलीय. मात्र, गृहमंत्री अमित शहा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेत मात्र वाढ झाल्याचं दिसून येतंय. मात्र, हे नेते अद्यापही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेच्या आकड्याजवळही पोहचू शकलेले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्यनंतर दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तब्बल ११ टक्के लोकांनी पुढच्या पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती म्हणून पसंती दर्शवलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता गेल्या एका वर्षांत ६६ टक्क्यांवरून घसरून केवळ २४ टक्क्यांवर येऊन पोहचलीय. म्हणजेच वर्षभरात मोदींच्या लोकप्रियतेत ४२ टक्क्यांची घट नोंदविण्यात आलीय.


'इंडिया टुडे' या एका इंग्रजी चॅनलनं केलेल्या 'मूड ऑफ द नेशन' नावानं एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेनंतर हा निष्कर्ष समोर आलाय. 'भारतासाठी सर्वात उपयुक्त आगामी पंतप्रधान कोण असायला हवा?' असा प्रश्न या सर्व्हेत विचारण्यात आला होता. हा सर्व्हे १० जुलै ते २० जुलै दरम्यान कार्वी इनसाईटस्  द्वारे पूर्ण करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post