कंत्राटदार कंपनीकड़ून २० लाख रूपयांची लाच, बडा अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

कंत्राटदार कंपनीकड़ून २० लाख रूपयांची लाच, बडा अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात 



मुंबई : कंत्राटदार कंपनीकड़ून २० लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोनोरेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. डी. एल.एन. मुर्ती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळयात अडकले आहे. याप्रकरणी एसीबीने गुुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. 

         

तक्रारदार यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी असून कंपनीला मुंबई मोनोरेल प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिसचे जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंतचे कंत्राट मिळाले होते. ऑगस्ट २०२० रोजी कंत्राटाप्रमाणे काम पूर्ण केले. ठरल्याप्रमाणे कामाचे बिल २ कोटी १० लाख तसेच २२ लाख गँरंटी रक्कम अदा करण्यात होती. त्यापैकी, ४० लाख रूपयांचे बिल आणि ११ लाख गँरंटी रक्कम मुंबई मोनोरेलकड़े थकीत होते.


         


मूर्ती यांनी तक्रारदार यांची फाईल स्वतःकड़े अडकवून २० लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकड़े धाव घेतली. गेल्या महिन्यात २ जुलै रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत मूर्ती यांनी पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सोमवारी याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post