मंदिरातून नरेंद्र मोदींचा पुतळा हलवला...राष्ट्रवादी करणार देव चोरीला गेल्याची तक्रार

मंदिरातून नरेंद्र मोदींचा पुतळा हलवला...राष्ट्रवादी करणार देव चोरीला गेल्याची तक्रार

 


पुणे:  पुण्यात औंध गावात उभारण्यात आलेल्या मंदिरात मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. मात्र आता हा पुतळा हटवण्यात आला आहे.  औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर हे मंदिर हटविण्यात आले असल्याची  माहिती समोर येत आहे. या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे.

 

पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ धाव घेतली. त्यांनी या भागात उपरोधिक आंदोलन केलं. 'देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही साकडं घालायला मंदिरात आलो होतो. मात्र भाजपचा देव काही केल्या आम्हाला दिसत नाहीए. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आलं,' अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. देव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post