मनसे विद्यार्थी सेनेकडून पूरग्रस्तांसाठी मोलाची मदत रवाना

 मनसे विद्यार्थी सेनेकडून पूरग्रस्तांसाठी मोलाची मदत रवानानगर-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अंबिकानगर च्या माध्यमातून कोकणातील तळीये आणि महाड या गावात तात्पुरत्या स्वरूपाची दहा घरांची मदत पाठवण्यात आलेली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे देखील समावेश आहे.चादरी, कपडे, पिण्याचे पाणी तसेच औषधोपचारासाठी संबंधित मदत कोकणातील बांधवांसाठी पाठवण्यात आली आहे .मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र सैनिक या नात्याने आणि आपल्या बांधवावर आलेल्या संकटाला  दूर करण्यासाठी आपण त्यांच्या मदतीला धावून गेलेच पाहिजे या भावनेतून ही मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून काम केलेले आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या घरांमुळे पूरग्रस्त लोकांना निवाऱ्याची मोठी सोय होणार आहे , या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे त्याच पैकी आय लव नगर चे श्री.नरेंद्रजी फिरोदिया तसेच श्री.आदेशजी चंगेडिया, श्री.गिरीषजी बांठीया , व अनेक दानशूरांनी आपले कर्तव्य बजावत सामाजिकतेची जाण करून दिली त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो.ही सर्व मदत मदत घेऊन तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपतालुकाध्यक्ष संकेत जरे , उपशहराध्यक्ष स्वप्निल वाघ , तालुका सहसचिव प्रमोद जाधव , शेतकरी सेनेचे आदेश गायकवाड , सागर मेहसूनी, विजय मोरे,सचिन शेळके,विकास शिंदे,सागर बनसोडे सह महाराष्ट्र सैनिक रवाना झाले.


जिल्हाध्यक्ष

सुमित संतोष वर्मा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post