मनसे आणि भाजप एकत्र येणार असेल तर आनंदच

मनसे आणि भाजप एकत्र येणार असेल तर आनंदच -  बाळा नांदगावकरमुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट झाली. या भेटीवर मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं.

राज ठाकरे, अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल, असं नांदगावकर म्हणाले. राजकारणात पुढच्या मुव्हमेंट करायच्या असतात. त्याचे काही ठोकताळे असतात. त्या ठोकताळ्याचा अंदाज प्रत्येक पक्ष घेत असतो. शरद पवारांनी ठोकताळ्यांचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंना बोलवून केलं ना सरकार. आजचाही हा ठोकताळाच आहे. त्याप्रमाणे होणार काही घटना, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post