स्वॅब न देताही करोना चाचणीचा रिपोर्ट...नगरमध्ये गंभीर प्रकार समोर

 स्वॅब न देताही करोना चाचणीचा रिपोर्ट...नगरमध्ये गंभीर प्रकार समोरनगर : आरटीपीसीआर करोना चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतरच अहवाल दिला जातो. पण नगरमध्ये एका व्यक्तीने स्वॅब न देताही त्याला करोना चाचणी अहवाल देण्यात आला आहे. हा अहवाल नकारात्मक असला तरी चाचणीसाठी सॅम्पल न देता अहवाल कसा दिला जावू शकतो. सरकारी यंत्रणेच्या या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी सोशल मिडियावर सदर अहवाल प्रकाशित करुन सरकारला जाब विचारला आहे. 

सुमित वर्मा यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे की, 

माझा सहकारी मित्र ****** ने कोरोना चाचणी केली नाही. तरी रिपोर्ट आला आता काय करायचे ? कृपया आपण यावर मार्गदर्शन करावे कारण WHO सुद्धा आपल्या सल्ल्याने काम करतं असं ऐकलं होतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post