पारनेर तहसीलदारांच्या पाठीमागे मनसे खंबीरपणे उभे राहणार

                          

   पारनेर तहसीलदारांच्या पाठीमागे मनसे खंबीरपणे उभे राहणार.      जनतेचे रक्षणकर्ते अडचणीत, सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचं?                         संबंधित लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी मनसेची मागणी    

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिलेली ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिप मध्ये पारनेर चे लोकप्रतिनिधी कशा प्रकारे अधिकाऱ्यांना त्रास देतात याचे कथन देवरे यांनी केलेय.  देवरे यांनी सर्वाना हेलावून सोडले आहे. देवरे यांनी अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू नये. मनसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा प्रस्ताव देत, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. आणि या ऑडिओ क्लिप ची चौकशी करा आणि दोषी लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, अशी मागणी या निवेदनात केली. तसेच लोकप्रतिनिधींच्या त्रास सहन होत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आत्महत्येचा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे पारनेर तालुक्यात एक महिला तहसीलदार अधिकारी सुरक्षित नसेल तर पारनेरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही व लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने अनेक पारनेर तालुक्यातील खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार झालेले आहेत त्यामुळे एक महिला अधिकारी तहसीलदार अशाप्रकारे आत्महत्येचा इशारा देत असेल तर यापेक्षा गांभीर्य परिस्थिती अजून तालुक्यात काय असू शकते त्यामुळे ज्योती देवरे यांचा जबाब नोंदवून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत जेणेकरून पारनेर तालुक्यात भयमुक्त वातावरण होईल. व                   मनसे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाकाऱ्यांनी देवरे यांना दिला आहे.              जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, जिल्हासचिव नितीन भूतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले आदी मनसे पदाधिकारी शिष्ठ मंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post