रावसाहेब दानवे यांची रेल्वे थेट मणिपुरात..हटके लूकची सोशल मिडियात चर्चा

रावसाहेब दानवे यांची रेल्वे थेट मणिपुरात..सत्कारावेळच्या भन्नाट फोटोची सोशल मिडियात चर्चा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच त्यांच्या एका सत्काराचे फोटो स्वतःच्या फेसबुक वॉलवर टाकले आहे. त्या फोटोने नव्या चर्चेला आणि सोशल मीडियातील खुमासदार गप्पांना वाट करून दिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सध्या मणिपूरच्या दौर्‍यावर आहेत. मणिपूरच्या  दौऱ्यावर असताना इम्फाळमध्ये त्यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.  'मणिपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी माझे पारंपारिक स्वागत केले, सर्वांचे आभार!' असा आशियाचा मजकूर टाकून त्यांनी दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांचे हे दोन हटके फोटो सोशल मीडियावर वायरल होऊ लागला आहे. त्यावर खुमासदार कॉमेंटही लिहिल्या जात आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post