जिल्ह्यात हळहळ....दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

 जिल्ह्यात हळहळ....दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यूकर्जत :-कर्जत तालुक्यातील ताजु गावातील मावळे वस्ती येथील पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरी नामदेव कोकरे (वय वर्ष 15) व विरेंद्र रामा हाके (वय वर्ष 16) हे दुपारी एक ते दोन च्या सुमारास शेळया चारण्यासाठी गेले होते. श्रीगोंदा तालुक्यातील भवानी मातेच्या मंदिरासमोर चोपडा यांचे शेततळे आहे. त्या शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील मावळेवस्ती येथील हरी नामदेव कोकरे व विरेंद्र रामा हाके हे शाळकरी मुले कोरोना काळात शाळेला सुट्टी असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील भवानी माता मंदिर परिसरात गेले. मंदिर परिसरात पुणे येथील चोपडा यांच्या शेतजमीनीत शेततळे आहे. दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले. परंतु त्यांना शेततळ्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान फक्त शेळ्या घरी आल्याने कुटुंबीयांनी मुले घरी का आली नाहीत म्हणून शोधाशोध सुरू केली. घरच्यांनी शोध घेतला असता मुलांचे कपडे व चपला भवानी माता मंदीरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ दिसल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post