पैशाच्या व्यवहारातून वडिलांची हत्या

 पैशाच्या व्यवहारातून वडिलांची हत्या, चार चुलतभावांच्या मदतीने अंत्यसंस्कार उरकलेबीड : बँकेतील पैशाच्या व्यवहारातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मुलाने वडिलांचे अंत्यसंस्कारही घाईघाईत उरकले. पण पोलिसांना एक निनावी फोन गेला आणि हत्येचं बिंग फुटलं. या प्रकरणी बीडमधील पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.बँकेतील पैशाच्या व्यवहारातून मुलाने वडिलांची हत्या करुन अंत्यसंस्कार देखील उरकल्याच्या घटनेने बीडमध्ये खळबळ माजली आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे घडली. महादेव औटे असं मयत पित्याचे नाव आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post